उमरड येथे विवाहितेचा विनयभंग – तिघाजणाविरुध्द गुन्हा दाखल

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता. १५ : उमरड (ता.करमाळा) येथील विवाहित महिलेचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी तिघाजणाविरूध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार उमरड येथे ११ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ६ वाजता घडला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
यात सदर विवाहित पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की मी ११ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ६ वाजता माझे घरासमोर चुलीवर पाणी तापायला ठेवून आंगण झाडत असताना पोपट कुंडलीक कदम हा आला व त्याने माझा विनयभंग केला, त्यानंतर त्याने माझे मनात लज्जा उत्पन्न होईल असे शब्द वापरले. त्यावेळी मी मोठ्याने ओरडले व तुला लाज आहे का, नाही असे म्हणाले. त्यावेळी त्याची पत्नी संगिता व मुलगा चैतन्य हे आले. त्यानंतर या सर्वांनी मला शिव्या दिल्या तसेच मारहाण केली.
या प्रकरणी पोलीसात तक्रार दिली, पण पोलीसांनी गुन्हा दाखल केला नाही, वरीष्टाकडे तक्रार दिली पण त्यांनीही दखल घेतली नाही. त्यामुळे न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायाधीश आर.ए.शिवरात्री यांच्या आदेशानंतर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.



