कंदर येथे दांम्पत्यास मारहाण – दोघांवर गुन्हा दाखल..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : तु रमेश लष्कर यास घराची खिडकी का बंद आहे, असे का विचारले याचा राग मनात धरून दोघाजणांनी पती-पत्नीस बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार १२ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कंदर (ता.करमाळा) येथे घडला आहे.
या प्रकरणी रोहिणी महेश पवार यांनी करमाळा पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, १२ जुन रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मी व माझे पती महेश पवार घरी असताना आमच्या शेजारी राहणारे सागर काशिनाथ तांदळे व सौरभ भिमराव ननवरे हे आमच्या घरासमोर आले व त्यांनी माझ्या नवऱ्यास बाहेर बोलावून तु रमेश लष्कर यास समोरील खिडकी बंद का आहे.. असे फोनवरून का विचारले याचा राग मनात धरून या दोघांनी माझ्या नवऱ्यास शिवीगाळ करून मारहाण केली आहे.
तसेच मी सोडविण्यास गेले असता मला ही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी करमाळा पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.