रस्त्यावर भांडण करणाऱ्या आठ जणाविरूध्द गुन्हा दाखल – सालसे येथील घटना..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : भर रस्त्यावर जोरजोराने भांडण करत एकमेकाला मारहाण करणाऱ्या आठ जणाविरूध्द करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार ९ एप्रिलला दुपारी ते सव्वाएक वाजता घडला आहे.
या प्रकरणी पोलीस नाईक प्रदीप चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की ९ एप्रिलला दुपारी बारा वाजता फोन आला व सालसे येथे बाहेरून आलेले लोक शिवीगाळ करत असल्याचे सांगितले. त्यामुळे मी खाजगी वाहनाने सालसे येथे गेलो असता, तेथे भारत सुखदेव रूपनवर, नामदेव भारत रूपनवर, बिरूदेव पोपट रूपनवर, प्रदीप भारत रूपनवर (सर्व रा.सालसे) तसेच वैभव लवटे, रविंद्र राजेंद्र लवटे, सुनील राजेंद्र लवटे, समाधान गोरख लवटे (सर्व रा. नाडी, ता. माढा) हे यातील रविंद्र लवटे याची पत्नी नांदत नाही या कारणावरून भर रस्त्यावर जमावबंदीचा आदेश असूनही झोंबा झोंबी करून आरडाओरडा करून शांततेचा भंग करत होते. या प्रकरणी पोलीसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.

