विवाहितेच्या छळ प्रकरणी चौघाविरूध्द गुन्हा दाखल.. - Saptahik Sandesh

विवाहितेच्या छळ प्रकरणी चौघाविरूध्द गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : माहेराहून पैसे का आणत नाही, असे म्हणून माहेरात येऊन विवाहितेस मारहाण करणाऱ्या सासरच्या चौघाजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शुभांगी गणेश झाकणे (रा. कुंभारगाव) या विवाहितेने फिर्याद दिली आहे.

त्यात तिने म्हटले आहे, की पेडगाव ता.श्रीगोंदा) येथील गणेश संजय झाकणे याच्याबरोबर माझा ६ मार्च २०१६ ला विवाह झाला. त्यानंतर मला शंभुराजे व श्लोक अशी दोन मुले झालेली आहेत. परंतु सासरचे लोक पैशाच्या कारणावरून मला त्रास देतात. नवरा दारू पिऊन मारहाण करतो. त्याने मला घरातून हाकलून दिले त्यामुळे मी माहेरी राहत होते. असे असताना ८ ऑक्टोबर २०२३ ला दुपारी दोन वाजता माझे पती गणेश झाकणे याने येऊन पैशाची व्यवस्था केली का.. असे म्हणून शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे.

यात सासू विजाबाई झाकणे, सासरे संजय झाकणे, दीर सोमनाथ उर्फ राहुल झाकणे, पती गणेश झाकणे या सर्वांनी २०१६ पासून आत्तापर्यंत माझा छळ केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!