सख्ख्या भावास काठीने मारहाण – भाऊ-पुतण्यासह चौघाविरूध्द गुन्हा दाखल..
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.22 : शेतीच्या बांधाच्या कारणावरून सख्ख्या भावाने व पुतण्यांनी काठीने मारहाण केली आहे.हा प्रकार शेलगाव (वांगी) येथे १७ मार्च ला सायंकाळी चार वाजता घडला आहे.या प्रकरणी भाऊ-पुतण्यासह चौघाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
यात सोमनाथ पांडूरंग मारकड (रा. शेलगांव वांगी ता. करमाळा) यांनी फिर्यादी दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की आम्हाला मौजे शेलगांव वांगी गावच्या शिवारात एकुण 4 एकर शेतजमिन असून त्यातुन येणारे उत्पन्नातुन मी माझे कुटूंबाची उपजिवीका भागवितो. माझे शेताशेजारी माझा सख्खा भाऊ विठठल पांडुरंग मारकड यांची शेतजमिन आहे. त्याच्यात व आमच्यात मागील दोन वर्षापासून शेतजमिनीच्या बांधाच्या कारणावरून भांडणे चालु असून त्याबाबत करमाळा कोर्टात दावा दाखल आहे. १७ मार्च २०२३ रोजी दुपारी ४ वा.च्या सुमारास मी व माझी दोन्ही मुले माझे शेती गट नं २४२ मध्ये केळी लागवड करणे करीता ड्रीप टाकण्याचे काम करीत होता.
माझा भाऊ विठठल हा त्याचे शेतात उस लागवडी करीता सरी पाडण्याचे काम करीत होता. मी लगेच विठठल यास म्हणालो की तु बांध टोकरुण सरी का काढत आहे असे म्हणताच विठठल याने शिवीगाळी करुन लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरवात केली व तेथेच विठठल याचा मुलगा गणेश हा पळत आला आणि मी तुम्हाला बघतोच असे म्हणून त्याचे हातातील काठीने माझे पाठीवर मारहाण करून लागला. आमचे भांडण सोडविण्या करीता माझा मुलगा प्रदिप हा मध्ये आला असता संपत याने प्रदिप याचे हाताचे बोटावर काठी मारली व मयुर नरूटे याने माझे पाठीवर दगड मारला तसेच हाताने लाथाबुक्याने मारहाण करून मला व माझा मुलगा प्रदिप यास संगनमत करुन शिवीगाळी दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे