करमाळा तहसिल व पोलीस कार्यालयासमोर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी - एकावर गुन्हा दाखल -

करमाळा तहसिल व पोलीस कार्यालयासमोर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी – एकावर गुन्हा दाखल

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : “माझे व्याजाचे पैसे दे, नाहीतर मी तुला जिव मारतो अशी धमकी देवुन एका व्यक्तीने पडलेला दगड घेवुन डोळ्यावर मारुन एका जणास जबर जखमी केल्याची घटना ८ ऑगस्टला रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास येथील तहसील व पोलीस कार्यालयासमोर घडली आहे.

याप्रकरणी विजयकुमार उत्तम नागवडे (वय 48) (रा.रावगाव ता. करमाळा) यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली असून, त्यात त्यांनी म्हटले कि, माझी सासरवाडी सारवला (ता.जामखेड जि. अहमदनगर) येथील मधुकर मच्छिद्र काशीद या व्यक्तीशी माझी ओळख झाली होती, त्यावेळी मी मधुकर काशीद यांचेकडुन व्याजाने पैसे घेतले होते.

तो व्यक्ती वारंवार मला व्याजाचे पैसे मागत होता, ८ ऑगस्ट रोजी दुपारी 12:00 वाचे सुमारास मी व माझी पत्नी सौ.पल्लवी विजयकुमार नागवडे असे मिळुन मधुकर मच्छिंद्र काशीद याचे विरुध्द करमाळा पोलीस ठाणेस तक्रार देणेसाठी आलो होतो. त्यानंतर तेथे मधुकर मच्छिद्र काशीद व त्यांची पत्नी (नाव माहित नाही) असे आले होते.

त्यावेळी मी तहसिल कार्यालय करमाळा येथील परिसरात असताना मधुकर मच्छिंद्र काशीद हा माझेजवळ आला व तो म्हणाला की, “माझे व्याजाचे पैसे दे नाहीतर मी तुला जिव मारतो अशी धमकी देवुन “त्याने तेथेच पडलेला दगड हातात घेवुन माझे उजव्या डोळ्यावर मारुन जखमी केले, त्यावेळी माझे नाकातून रक्त येवु लागले होते. तेव्हा मी लागलीच त्याचेविरुध्द तक्रार देणेसाठी पोलीस ठाणेस गेलो असता मला तेथील पोलीसांनी उपचार कामी मेडीकल यादी दिली होती. मी व माझी पत्नी सौ.पल्लवी असे मिळुन उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे उपचारकामी गेलो असता तेथील डॉक्टरांनी माझेवर प्रथमोपचार करून पुढील उपचार करीता सिव्हील हॉस्पीटल सोलापुर येथे पाठविले. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी मधुकर मच्छिंद्र काशीद यांचेवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!