मटका चालविणाऱ्या विरूध्द गुन्हा दाखल.. - Saptahik Sandesh

मटका चालविणाऱ्या विरूध्द गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : करमाळा शहरात नगरपालिका गाळ्याजवळ मटका चालविणाऱ्या विरूध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २४ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहा वाजता घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की करमाळा शहरात मिलन मटका चालवणारा अनिल लाला थोरात (रा. भोसे) हा पांढऱ्या रंगाच्या स्लीपबूकवर निळ्या बॉलपेनने आकडे घेत होता. त्यास मुद्देमालासह पकडले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून त्याच्याकडून पांढऱ्या रंगाचे स्लीप बुक, बॉलपेन व ७०० रू. जप्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!