वाशिंबे येथे 26 वर्षांच्या विवाहितेची आत्महत्या - पती व इतर चार जणांवर गुन्हा दाखल.. - Saptahik Sandesh

वाशिंबे येथे 26 वर्षांच्या विवाहितेची आत्महत्या – पती व इतर चार जणांवर गुन्हा दाखल..

Crime

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : वाशिंबे (ता.करमाळा) येथील एका 26 वर्षांच्या विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळुन आत्महत्या केल्याची घटना 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली आहे. कल्याणी प्रकाश झोळ (वय-26) (रा वाशिंबे ता.करमाळा) असे मयत विवाहितेचे नाव असून, याप्रकरणी पतीसह चार जणांवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विठ्ठल श्रीरंग घाडगे (रा.झरे, ता.करमाळा) यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली असून, त्यात त्यांनी म्हटले आहे कि, सन २०१९ मध्ये माझी मुलगी कल्याणी हिचे लग्न प्रकाश झोळ यांच्यासोबत झाले होते. मुलगी कल्याणी हिला सासरे पंढरीनाथ झोळ, सासु कौसाबाई झोळ, पती प्रकाश झोळ, नणंद मोहिनी संजय खेडकर, प्रमिला निलेश जाधव यांनी आपापसात संगनमत करुन तिला माहेरुन एक लाख रुपये घेवुन येण्याचे कारणावरुन व घरातील किरकोळ कारणावरुन मानसिक व शारिरिक त्रास देवुन तिला आत्महत्येस प्रवृत केले आहे, याप्रकरणी पोलिसांनी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास करमाळा पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!