कोर्टी येथे मटका चालकावर गुन्हा दाखल - Saptahik Sandesh

कोर्टी येथे मटका चालकावर गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : कोर्टी (ता. करमाळा) येथे मटका चालविणाऱ्या आकाश नामदेव माने (रा. कोर्टी) याच्याविरूध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १० जुलैला रात्री नऊ वाजता घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश लालासाहेब शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की कोर्टी येथे कैकाड गल्ली पंचासह आम्ही गेलो असता, तेथे आकाश नामदेव माने हा पांढऱ्या रंगाची स्लीप बुक व पेन घेऊन मटक्याचे आकडे घेताना आढळून आला. त्याच्याकडून पांढऱ्या रंगाची स्लीप बुक, नीळ्या शाईचा बॉलपेन व १०५० रू. जप्त केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!