पैशासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल.. - Saptahik Sandesh

पैशासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : माहेराहून दोन लाख रूपये घेऊन ये.. या कारणावरून विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या सहा जणांविरूध्द करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी श्रध्दा रविराज पवार (रा. लक्ष्मी टिबज् मधुराईनगर, तुळजापूर, ह. रा. जेऊर) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की.. माझा विवाह रविराज श्रीराम पवार (रा.तुळजापूर) यांचेबरोबर २९ नोव्हेंबर २०२३ रोजी झाला आहे. लग्नानंतर सुरूवातीचे काही दिवस मला चांगले सांभाळले. त्यानंतर सासू अनुराधा, सासरे श्रीराम, दीर मयुर व रोहित, जाऊ भाग्यश्री उर्फ वृषाली या सर्वांनी माहेराहून दोन लाख रूपये घेऊन ये अशी मागणी केली.

ती मागणी पूर्ण न केल्याने या सर्वांनी माझा छळ सुरू केला. माझे पती रविराज यांना ही बाब सांगितली असता, त्यांनी तुझ्याशी लग्न करून माझे नुकसान झाले आहे. लग्नात तुझ्या घरच्यांनी मानपान केला नाही. तु दोन लाख रूपये घेऊन ये म्हणून मारहाण व शिवीगाळ केली. या प्रकरणी पोलीसांनी पती, सासू, सासरे, दीर, जाऊ या सर्वांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!