केत्तूर नाका येथे भरधाव वेगात चालविणाऱ्या टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल -

केत्तूर नाका येथे भरधाव वेगात चालविणाऱ्या टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0


करमाळा/ संदेश प्रतिनिधी : 

करमाळा, ता.६: शहरातील केत्तूर नाका परिसरात वाहतूक नियंत्रण सुरू असताना एक चारचाकी टेम्पो चालक भरधाव वेगात वाहन चालवत असल्याची घटना घडली असून, संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल (ता.५ ) सकाळी सुमारे १०:३५ वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचारी केत्तूर नाका येथे वाहतूक नियंत्रण करत असताना, पुणे रस्त्यावरून करमाळ्याकडे येणारा टेम्पो (क्र. MH 45 AK 1070) हा चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत अत्यंत बेफिकीरपणे चालवला. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला.
पोलीसांनी तत्काळ वाहन थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव शिवाजी मारुती देवकते (वय ४८, रा. धायखिंडी, ता. करमाळा) असे सांगितले. या प्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!