दारू पिवून तहसील कार्यालयाजवळ गोंधळ करणाऱ्यावर गुन्हा दाखल
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : दारू पिऊन तहसील कार्यालय परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ करून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या विरूध करमाळा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सौदागर ताकभाते यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, की ११ एप्रिलला सायंकाळी साडेसातच्या सुमारास सागर नवनाथ बनसोडे, वय – २६, रा. शेलगाव (वीराचे) हा दारू पिण्याचे लायसन्स नसताना दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शिव्या देऊन – सार्वजनिक शांततेचा भंग करत होता. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत हराळे हे करत आहेत.