दारू पिऊन कंटेनर चालविणाऱ्या विरूध्द गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : दारू पिऊन करमाळा-नगर रस्त्यावर मांगी जुन्या टोलनाक्या जवळ कंटेनर चालविणाऱ्यास पोलीसांनी रंगेहाथ पकडून त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ५ ऑगस्टला सायंकाळी चार वाजता घडला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मयुर नागेश कदम यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की करमाळा – जातेगाव रोडवर पेट्रोलिंगचे काम करीत असताना राजेशकुमार मथुरालाल मीना (रा. गेरूथा, ता. जहाजपूर, जि. भिलवाडा, राजस्थान) हा त्याच्या ताब्यातील कंटेनर क्र. एनएल ०५ एएच ८०३९ हा दारू पिऊन मांगी जुन्या टोलनाक्याजवळ आढळून आला. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



