केम येथे मटका घेणाऱ्यावर गुन्हा दाखल
करमाळा (संदेश प्रतिनिधी)- केम येथील नागणे गल्लीमध्ये ‘मिलन नाईट’ नावाचा मटका जुगार मटका चालविणाऱ्या प्रौढावर करमाळा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३० नोव्हेंबरला सायंकाळी साडेसात वाजता घडला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ जगताप यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की केम येथील नागने गल्लीत मारूती भानुदास अवघडे (वय ५१) हा ‘मिलन नाईट’ नावाच्या मटक्याच्या चिठ्ठ्या फाडताना व लोकांकडून पैसे घेताना आढळून आला. त्याच्याकडे रोख १०४० रूपये, पांढऱ्या रंगाची स्लिप व निळ्या शाईचा बॉलपेन सापडला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
केम परिसरातील हमाल, कष्टकरी मेहनतीने कमावलेले पैसे जुगारामध्ये घालवत आहे. त्यामुळे पोलिसांनी मटक्याविरुद्ध केलेली सदरची कारवाई ही गरजेची आहे. परंतु पोलिसांनी फक्त एकाच व्यक्तीवर कारवाई केली आहे. केम येथील मेन चौकात दररोज खुले आम कमीत कमी दहा ते बारा एजंट मटका चालवतात. त्यामुळे पोलिसांनी फक्त नागरिकांना दाखविण्या करिता एखादी-दुसरी कारवाई न करता ठोसपणे जुगार बंदच होईल असा बंदोबस्त करावा.
– केम येथील एक नागरिक