जमिनीच्या वादातून घर पाडून केली मारहाण - तिघांविरूध्द गुन्हा दाखल... - Saptahik Sandesh

जमिनीच्या वादातून घर पाडून केली मारहाण – तिघांविरूध्द गुन्हा दाखल…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शेतजमिनीच्या वहिवाटीवरून शेतीबांधाच्या मालकी हक्कावरून शेतातील घर पाडून दोघांना मारहाण केली आहे. हा प्रकार १ जुलैला दुपारी दोन ते साडेपाचच्या दरम्यान केम (ता. करमाळा) येथे घडला आहे. या प्रकरणी संजय गणपत बेद्रे (रा. केम) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की १ जुलैला दुपारी दोन ते साडेपाच च्या दरम्यान आमच्या शेतीमध्ये उत्तरेश्वर हनुमान बेद्रे, नामदेव गणपत बेद्रे व स्वप्नील नामदेव बेद्रे यांच्यात वाद चालू आहे. या वादावरून त्यांनी माझ्या मालकीच्या घरात जबरदस्तीने घुसून टिकाव फावड्याने घर पाडून घराचे नुकसान केले आहे. तसेच मला व माझ्या पत्नीस शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!