जुन्या वादातून एकाच भावकीत हाणामारी-जीवे मारण्याचा गुन्हा दाखल - वडशिवणे येथील घटना.. - Saptahik Sandesh

जुन्या वादातून एकाच भावकीत हाणामारी-जीवे मारण्याचा गुन्हा दाखल – वडशिवणे येथील घटना..

करमाळा/ संदेश प्रतिनिधी

करमाळा,ता.१६ : रस्त्यावरून असलेल्या जुन्या भांडणावरून भावकीत हाणामारी झाली.हा प्रकार वडशिवणे येथे १३ जून ला सायांकाळी ४ वाजता झाला आहे. त्यात दोन्ही गटाने एकमेकाविरूध्द फिर्यादी दिल्या आहेत. यात एक गुन्हा जीवे मारण्याचा दाखल झाला आहे तर दुसरा गंभीर दुखापतीचा झाला आहे.

यात पहिली फिर्याद दत्तात्रय मधुकर काळे, रा. वडशिवणे यांनी फिर्याद दिली त्यात त्यांनी म्हटले, की १३ जून ला सायंकाळी ५ वाजता माझे वडील मधुकर काळे यांनी बळीराम काळे यांना तुम्ही आमचे समायकातील असलेले झाड का तोडले, अशी विचारणा केली.

त्यावेळी ब्रम्हदेव काळे घरी गेले व त्यांनी पुन्हा बळीराम काळे, दिलीप काळे, ज्योतिराम काळे, भैरू काळे सर्व रा.वडशिवणे यांना घेऊन आले व त्यांनी आल्या आल्या माझ्या वडीलांना शिव्या देऊन मारहाण करायला सुरवात केली. मी त्यांना सोडवायला गेलो, तर त्यांनी मला गजाने माझ्या डोक्यात मारले, तसेच माझा भाऊ सुहास व भावजय रेणुका हे शाळेतून आले, त्यांनासुध्दा या लोकांनी मारहाण केली दुसरा भाऊ संदिपान व आई नागरबाई हे भांडण सोडवण्यास आले.

त्यांनासुध्दा या सर्वांनी काठीने व हाताने मारहाण करून जखमी केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी वरील आरोपीच्या विरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर कुंजीर हे करत आहेत.

दुसरी फिर्याद बळीराम ब्रम्हदेव काळे रा. वडशिवणे यांनी दिलीअसून, त्यात त्यांनी म्हटले की, आमच्या शेतात जाण्यासाठी कॅनल ते कविटगाव सा रस्ता आहे. त्यास मधुकार काळे व त्याची मुले हरकत करत आहेत. १३ जून ला सायंकाळी ४ वाजता आमच्या घरात मधुकर काळे, संदिप काळे, सुहास काळे व दत्तात्रय काळे सर्व रा. वडशिवणे आले व त्यांनी वडील ब्रम्हदेव काळे यांना गजाने मारहाण करून त्यांच्या छातीच्या बरगड्या मोडल्या आहेत. तर मी सोडवण्यास गेलो असता माझे डोक्यात, चेहऱ्यावर, दोन्ही हातावर, दोन्ही पायावर जीवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली आहे. मी अशाहीस्थितीत मोबाईलवर सर्व शुटींग करत असताना त्यांनी माझा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला आहे. यात माझी भावजयी प्रिती काळे हीसुध्दा जखमी झाली आहे. मारण्याचा हक्का अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. याचाही यात पोलीसांनी जीवे तपास पोलीस उप निरीक्षक सागर कुंजीर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!