समाईक पाईप लाईनवरून सख्ख्या भावांची हाणामारी - गुन्हा दाखल.. -

समाईक पाईप लाईनवरून सख्ख्या भावांची हाणामारी – गुन्हा दाखल..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा, ता. १६ : समाईक पाईप लाईनवरून सख्ख्या भावांची हाणामारी झाली आहे. हा प्रकार हिसरे येथे १४ जून ला रात्री ८ वाजता घडला आहे.

यात सुग्रीव बाबा हजारे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले, की माझा मोठा भाऊ जयद्रथ हजारे व माझ्यात समाईक पाईप लाईन आहे. त्यावरून किरकोळ वाद झाला होता. त्यामुळे १४ जुन ला रात्री ८ वाजता मी व परिवारातील लोक घराबाहेर गप्पा मारत बसलो होतो. त्यावेळी जयद्रथ हजारे, त्याची पत्नी लक्ष्मीबाई, मुलगा नामदेव, सून बानुबाई हजारे हे हातात गज व दगड घेऊन आले व त्यांनी मला माझी पत्नी रसिका हीला बेदम मारहाण करून जखमी केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!