जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी केम येथे गुन्हा दाखल.. - Saptahik Sandesh

जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी केम येथे गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा, ता. ९ : केम (ता. करमाळा) येथे जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी एका विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार ७ मे ला रात्री ८ वाजता केम गावातच घडला आहे.

या प्रकरणी रूपेश नागन्नाथ गायकवाड (रा. उपळवटे, ता. माढा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले, की मी केम येथे भाजीपाला व्यवसाय करतो. बाळू तळेकर याची व माझी चांगली ओळख आहे. त्याला मी कोणत्या जातीचा आहे, हे माहित आहे. ७ मे २०२३ रोजी रात्री बाळू तळेकर याच्या गडयाचे भाजीचे पैस श्री. तळेकर यास मागितले असता, तो म्हणाला, तू कोठे आहेस..? मी म्हणालो की मी दुर्वा चायनिज जवळ आहे. तिथे तो आला व म्हणाला तुझा भाऊ शूभम गायकवाड यांने माझे मामाच्या मुलगा हरीदास खुपसे वर ॲट्रॅसीटीचा गुन्हा दाखल केला असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!