खोटे पुरावे तयार करून सावडी सोसायटीची निवडणूक लढवली – पोलीसात गुन्हा दाखल..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : सावडी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत परदेशात असलेल्या व्यक्तीच्या नावे निवडणूक लढवून विजयी झालेल्या व्यक्तीच्या विरूध्द खोटे कागदपत्र तयार केल्याबाबत करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी काशिनाथ भिमराव काकडे यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की सावडी येथील विविध कार्यकारी संस्थेची निवडणूक झाली. त्यावेळी १० एप्रिल २०२३ ला रेवणनाथ भगवान येदवते यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. रेवणनाथ देवकते हा परदेशात होता. परंतु त्याचा अर्ज माऊली संजय शेळके व संजय विश्वनाथ शेळके या दोघांनी सूचक व अनुमोदन देऊन फॉर्म भरला आहे. तर अनिल पंढरीनाथ देशमुख याने तहसीलार यांचे समोर रेवणनाथ येदवते याच्या फोटोवरून भाऊसाहेब येदवते व रेवणनाथ येदवते हे दोन्ही एकाच नावाचे व्यक्ती आहेत; असे खोटे प्रतिज्ञापत्र केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी या सर्वांच्या विरूध्द गुन्हा दाखला केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर कुंजीर हे करत आहेत.