कंदर येथील मारामारी प्रकरणी दोघांविरूध्द सार्वजनिक शांतताभंगबाबत गुन्हा दाखल... - Saptahik Sandesh

कंदर येथील मारामारी प्रकरणी दोघांविरूध्द सार्वजनिक शांतताभंगबाबत गुन्हा दाखल…

Oplus_131072

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कंदर येथे १८ सप्टेंबर २०२४ रोजी दोन गटात झालेल्या मारामारी प्रकरणी पोलीसांनी २८ सप्टेंबरला दोघांच्या विरूध्द सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पोलीस नाईक प्रमोद पंढरीनाथ गवळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की १८ सप्टेंबर २०२४ रोजी कंदर येथील टकले हॉस्पीटल समोर अमर रविराज पराडे व उमेश अर्जुन इंगळे या दोघांनी सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून सार्वजनिक शांतता बिघडवली आहे. याबाबत त्यांच्याशी चौकशी केली असता, दोघेही वेगवेगळ्या रूग्णालयात उपचार घेत असल्याचे समजले आहे. याबाबत दोन्ही प्रतिनिधींना जबाब देण्याबाबत सुचविले परंतू जबाब दिले नाही. तसेच कोणीही फिर्याद दिली नाही.

याबाबत आणखीन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून सदरची फिर्याद देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!