ऊस तोडीला मजूर देतो म्हणून ६ लाख ४६ हजार रकमेचा अपहार – पोलीसात गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : तुम्हांस ऊस तोडीसाठी २४ मजूर देतो असे म्हणून ६ लाख ४६ हजार रूपये घेऊन त्याचा अपहार करणाऱ्या विरूध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शामकांत काशिनाथ काकडे (रा. सावडी) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की दौंड शुगर्स प्रा. लि. आलेगाव या कारखान्याला ऊस वाहतुकीचा करार केला होता. त्या कामासाठी मजुर शोधत असताना रोहिदास शालीकर ठाकरे (रा. हट्टीखुर्द, ता.साक्री, जि.धुळे) याने मजूर पुरवतो असे म्हणून त्याने १२ ऊसतोड जोड्यासाठी ६ लाख ४६ हजार रूपये घेतले. त्यानंतर त्याने मजुरही दिले नाही व पैसेही दिले नाहीत. संबंधिताने मजुर देतो म्हणून फसवणूक केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



