वडशिवणे येथे स्मशानभूमीत वृक्षारोपण करून मुलाचा वाढदिवस केला साजरा

केम (संजय जाधव) – पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. मे महिन्यात तापमान 43 अंशाच्या पुढे गेले होते. पाऊस अनियमित पडतो. या पार्श्वभूमीवर वडशिवणे (ता. करमाळा) येथील प्राध्यापक विजय जगदाळे यांनी त्यांचा मुलगा राज जगदाळे याच्या पहिल्या वाढदिवसा दिवशी वडशिवणे येथील स्मशानभूमीत चार वडाच्या फांद्या लावून उत्साहात साजरा केला आहे.

गेल्या तीन वर्षापासून वडशिवणेच्या स्मशानभूमी परिसरात गावातील प्रा.जगदाळे, नवनाथ लोंढे ,गोरख अप्पा जगदाळे, भाऊ अंधारे, शिवाजी पवार, दत्तात्रेय कामठे, राहुल जगदाळे ,अनंता शेळके ,आनंद शेलार आदींनी झाडे लावून ती जगवली आहेत. तीन वर्षांपूर्वी व नंतर लावलेले झाडं आता जोमानं वाढत आहेत. हिरव्यागार झाडांमुळे स्मशानभूमीला शोभा येत आहे. आता त्यात चार नवीन वडाच्या झाडाची भर पडली आहे. स्मशानभूमीतील वड,लिंब,पिंपळ इ.हिरवीगार झाडांमुळे स्मशानभूमीचे रूप पालटून गेले आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक घरापुढे एक तरी झाड लावले तर पर्यावरणचा समतोल राखला जाईल .पाऊस वेळेवर पडेल, तापमानाचा नागरिकांना त्रास होणार काही, असा संदेश पर्यावरण प्रेमी हे नवनाथ लोंढे यांनी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात दिला.


