सावडी येथे २ ते ९ ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

करमाळा(दि. 1): सावडी (ता. करमाळा) येथे दिनांक २ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत हिराभारती महाराज यांच्या प्रेरणेने अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पंचक्रोशीतील श्रद्धावान भक्तांसाठी ही एक अध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे. हा सप्ताह सावडी येथील समस्त एकाड पाटील परिवार यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला आहे.

या हरिनाम सप्ताहात ह.भ.प. मनोहर महाराज बेलापूरकर (२ ऑगस्ट), ह.भ.प. गुलाब महाराज भराठे (३ ऑगस्ट), ह.भ.प. कबीर महाराज अत्तार (४ ऑगस्ट), ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर (५ ऑगस्ट), ह.भ.प. रामराव महाराज ढोक (६ ऑगस्ट), ह.भ.प. विशाल महाराज खोले (७ ऑगस्ट), ह.भ.प. सोपान महाराज सानप शास्त्री (८ ऑगस्ट), आणि ह.भ.प. माऊली महाराज कदम (९ ऑगस्ट) यांचे सकाळी ९ ते १२ या वेळेत काल्याचे कीर्तन होणार आहे.

सप्ताहात दररोजचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे असतील:
🔹 पहाटे ४ ते ६ – काकड आरती
🔹 सकाळी ७ ते ११ – ज्ञानेश्वरी पारायण
🔹 सकाळी ११ ते १ – गाथा भजन
🔹 दुपारी ४ ते ५ – भागवत कथा
🔹 सायंकाळी ५ ते ६ – हरिपाठ
🔹 रात्री ९ ते ११ – कीर्तन व नंतर सार्वजनिक हरिजागर

हा संपूर्ण सप्ताह समस्त ग्रामस्थ आणि भजनी मंडळ सावडी यांच्या एकत्रित सहभागातून संपन्न होत आहे. पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या अध्यात्मिक सप्ताहात सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.



