किरकोळ कारणावरून दांपत्यास चौघाकडून मारहाण..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा, ता. ५ : किरकोळ कारणावरून दापंत्यास चौघाकडून बेदम मारहाण झाली ९ वाजता पारेवाडी येथे घडला आहे. हा प्रकार काल (ता. ५) सकाळी यात वसं मारूती शिंदे (रा.पारेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले, की काल सकाळी ९ वाजता मी व माझी पत्नी शांता घरासमोर बसलो असताना तिथे रविंद्र उर्फ बबन अरूण शिंदे, पोपट अरूण शिंदे, अरूण दाजी शिंदे व निलाबाई अरुण शिंदे सर्व रा.पारेवाडी हे आले व तुम्ही जागा सोडा तुमचा काही संबंध नाही, तुझ्या पोराला नोकरी कशी लागते ते क्यतो असे म्हणून शिवीगाळ करू लागले. त्यांना तुम्ही असे म्हणू नका, कशाला त्रास देता, असे म्हटल्यावर या चौघांनी दगडाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, शिव्या व दमबाजी केली आहे. विरूध्द गुन्हा दाखल झाला असून, पुढील याप्रकरणी वरील चौघाच्या तपास हावलदार प्रशांत गायकवाड हे करत आहेत.