सोशल मिडीयावर सामाजिक भावाना दुखविण्याचा स्टेटस ठेवणाऱ्या विरूध्द गुन्हा दाखल

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सोशल मिडीयावर सामाजिक भावना दुखावतील असा स्टेटस ठेवणाऱ्या तरूणाच्या विरूध्द करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी शशिकांत आनंदराव पवार (रा. भालेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की ७ मार्च ला रात्री १० वा. ११ मि. व्हॉटसअपवरती अरबाज नसीर मुजावर (रा. पांडे) याने व्हॉटसअपवर सामाजिक भावना दुखावतील असा स्टेटस ठेवला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणातील आरोपी अरबाज मुजावर याने जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता, परंतु सदरचा जमीन न्यायाधीश एस.पी.कुलकर्णी यांनी फेटाळला आहे.
अशाप्रकारे थोर पुरुषांचा अवमान करणाऱ्या अरबाज मुजावर याच्या बाजुने कोणीही वकिलपत्र दाखल करणार नाही; असा निर्णय येथील करमाळा वकील संघाने घेतला होता. त्यानुसार कोणत्याही वकिलाने मुजावर याचे बाजूने काम केले नाही. याबाबत वकिल संघटनेचे अभिनंदन शशिकांत पवार यांनी केले आहे.





