शेतमजूराच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत जिद्दीने मिळवले 90% टक्के गुण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : “कसलीही ट्यूशन जादा तास न लावता शेटफळ (ता. करमाळा) येथील येथील अशिक्षित शेतमजूराच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत नव्वद टक्के गुण जिद्दीने मिळवले आहेत, शेटफळ येथील गणेश नलवडेची परिस्थितीवर मात करत यशाला गवसणी घातली आहे. यापुढेही चांगला अभ्यास करून इंजिनियर होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा गणेशला आत्मविश्वास आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल ग्रामस्थांच्यावतीने झाला सन्मान करण्यात आला.


विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत पुर्वीपासून दहावीच्या परीक्षेचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.दहावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील हा म्हणजे टर्निंग पॉईंट समजला जातो. दहावी मध्ये मुलगा गेला की त्या मुलाबरोबर त्याचे आई-वडिलांचीही यावर्षी ही मोठी परीक्षा असते. यामुळे चांगल्या यशासाठी पालक मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता भासू देत नाहीत.


भविष्यात आपला मुलगा काय करू शकतो याचा अंदाज बऱ्याचदा दहावीच्या निकालावरूनच बांधला जातो. शेटफळ येथील सतीश नलवडे हे शेतमजूर म्हणून काम करतात. गावात त्यांना स्वतःची एक गुंठाही जमीन नाही.दोघे पती – पत्नी दररोज कुणाच्यातरी शेतावर मोल मजुरी करून आपला चरितार्थ चालवतात . त्यांचा दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

दररोज लोकांच्या शेतावर मोलमजुरी करून त्यांनी मोठ्या दोन्ही मुलींची शिक्षण पुर्ण केली आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करत त्यांचे विवाह करून दिले. दोन मुलींच्या विवाहाच्या खर्चामुळे घरात कायम पैशाची चणचण होती. मुलाच्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा ते पुर्ण करू शकत नव्हते . गणेश हा कर्जत येथील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षण घेत आहे.

आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीव असल्याने त्याने घरच्यांना खर्चाचा कसलाही त्रास न देता कोणतेही ट्यूशन न लावता चिकाटीने अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत 90: 40 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. या यशामुळे त्याच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला असून भविष्यात आपला मुलगा नक्कीच यशस्वीपणे आपले शिक्षण पूर्ण करेल.

गणेशने सुद्धा आत्मविश्वासाने शास्त्र शाखेला प्रवेश घेऊन सीईटीची तयारी करत अभियंता बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून आपली वाटचाल सुरू केली आहे. गावातील या होतकरून मुलाने मिळवलेल्या यशाबद्दल येथील जिव्हाळा ग्रुप व ग्रामस्थांच्या वतीने श्रीगोंदा येथील छत्रपती महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा सचिन धेंडे यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला यावेळी जिव्हाळा ग्रुपचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!