घारगाव मध्ये शॉर्टसर्किट होऊन शेतकऱ्याचा ऊस जळून खाक

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील घारगाव येथे काल (दि.२९) दुपारी दोनच्या दरम्यान लाईटचे शॉर्टसर्किट होऊन जमीन गट नंबर ९३ मधील एक हेक्टर ऊस जळून खाक झाला असल्याची तक्रार सदर जमिनीचे मालक सुरेखा कैलास गायकवाड यांनी महावितरण कडे केली.

या सोबतच शेती उपयोगी साहित्य, वायर, पाईप व इतर साहित्य जळून गेल्याचे दिसून येत आहे. गायकवाड यांनी महावितरण कडे केलेल्या तक्रारीनंतर काल (दि.२९) अडीच वाजता पंचा समक्ष घारगावचे तलाठी क्षिरसागर भाऊसाहेब आणि वायरमन भरणे यांनी घटनास्थळी समक्ष भेट देऊन पंचनामा केला आहे. सदर ठिकाणी पाहणी केली असता असे निदर्शनास आले की लाईटच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली आणि ऊस जळून खाक झाला त्यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!