पाण्यात झोपुन अडकलेला टमटम काढावा लागला – केम रेल्वे बोगद्या जवळील घटना

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम-रोपळे रोडवरील रेल्वे बोगद्या जवळ रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचते. वाहन चालकाला याचा अंदाज येत नसल्याने वारंवार गाडया अडकतात. त्यामुळे वाहतूक खोळंबते दोन दिवसापूर्वी या खड्ड्यात टमटम अडकली होती. त्या गाडीचे चालक सतीश पाटील यांनी अक्षरशः पुलाखालील पाण्यामध्ये झोपून टमटम काढण्यासाठी प्रयत्न केले व दूध गाडीच्या साह्यानं फुगे यानी मदत करून टमटम बाहेर काढली. तो पर्यंत एक तास वाहतूक खोळंबली दोन्ही बाजुने वाहतूक थांबली त्यामुळे वाहनधारकांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

पावसाळ्यात या पुलाखाली कायम पाणी साचलेले असते पावसाळा आहे तो पर्यंत या या रस्त्यावरून वाहन धारकांना जीव मुठीत घेऊन गाडया चालवाव्या लागतात. व पायी येणाऱ्या नागरिकांना याचा सामना करावा लागतो या ठिकाणी मोटारसायकल अडकून लहन मोठे अपघात होत आहे या कडे कोणत्याही लोकप्रतिनिधी चे लक्ष नाही व येथील जनता पण शांत आहे. पण आता यासाठी शिवसेना महिला आघाडी रणांगणात उतरली आहे. १५ ऑगस्ट पर्यंत संबंधित बांधकाम खात्याने दुरूस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख वर्षांताई चव्हाण यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. या आंदोलनास प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर व युवासेनेचे समन्वयक सागर राजे तळेकर यांनी पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!