स्व. डॉ. प्रसाद भुजबळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विहाळ येथे भव्य रक्तदान शिबिर -

स्व. डॉ. प्रसाद भुजबळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विहाळ येथे भव्य रक्तदान शिबिर

0

करमाळा (दि. ३१) : करमाळा मेडिकोज गिल्डचे संस्थापक उपाध्यक्ष स्व. डॉ. प्रसाद एकनाथ भुजबळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विहाळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत पार पडणार असून, कमला भवानी ब्लड सेंटर, करमाळा यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात येईल.
परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!