केम येथे विविध धार्मिक कार्यक्रमांसह श्रीरामाच्या रथाची काढली भव्य मिरवणूक
केम (संजय जाधव) – अयोध्या येथील श्रीराम लल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त केम येथील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये सकाळी ६ ते ७ काकडा आरती ७ ते ८ श्रीस, अभिषेक,८ ते ९ भजन, ९ ते ११.३०श्री, रामाची रथाची भव्य मिरवणूक श्रीराममंदिर येथून सुरू झाली. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर मध्ये श्री,रामाची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली होती .
या शोभायात्रेत काकडा,आरती,भजनी,मंडळ, राम भक्तांच्या हाती भगवे,झेंडे महिलांच्या डोक्यावर तुळसी, तसेच श्री, ऊत्तरेश्वर हायस्कूल व राजाभाऊ तळेकर विद्यालयातील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते जय, श्रीराम या घोषणा नी संपूर्ण केम राममय, झाले होते. या शोभायात्रेत भाविक हि मोठया संख्येने उपस्थित होते मिरवणूक मार्गावर महिलांनी सडा टाकून रांगोळी घातली होती. राम भक्त उत्तरेश्वर टोंपे शंखनाद करीत होते जागोजागी, श्री, रामाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
शोभायात्रा चौकात आल्यावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली हि शोभायात्रा मंदिरात आल्यावर श्री,राम जप करण्यात आले त्यानंतर आयोध्या येथील ऐतिहासिक सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले त्यामुळे केम येथील राम, भक्त ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार ठरले तसेच येथील ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर , शिवलिंगास श्री रामाची प्रतिमा तयार करण्यात आली होती व मंदिरात शुभम पेटकर या कलाकाराने भव्य रांगोळी मधुन श्रीरामाची प्रतिमा साकारली होती. भाविक या रांगोळीचे कौतुक करत होते. टिळक, मित्रमंडळींच्या सौजन्याने श्री,राम मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली तर अयोध्या येथील ऐतिहासिक सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण श्री, ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे वतीने दाखवण्यात आले महाप्रसादाची सोय केम येथील कुंकू कारखानदार यांच्या वतीने करण्यात आली याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
अयोध्या येथील ऐतिहासिक सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे वतीने दाखवण्यात आले त्यामुळे केम येथील भाविक या सोहळ्याचे साक्षीदार ठरले या मुळे केम ग्रामस्थानी श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे आभार मानले