करमाळ्यात उमाजी नाईक जयंतीनिमित्त उद्या भव्य मिरवणूक

करमाळा : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात प्रथमच भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन जय मल्हार क्रांती संघटना, करमाळा तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

रविवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. बॅंजो व हालगीच्या गजरात ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात येणार आहे.

मिरवणूक मार्ग – गायकवाड चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, जय महाराष्ट्र चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (पुष्पहार अर्पण) – भवानी नाका, देवीचा रोड मार्गे अथर्व मंगल कार्यालय, श्री देवीचामाळ.

यानंतर दुपारी १२ वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला आमदार गोपीचंद पडळकर आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या भव्य मिरवणुकीत व कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक जय मल्हार क्रांती संघटना, करमाळा तालुका यांनी केले आहे.


