कोर्टातील ‘केस’मध्ये मदत करत असल्याच्या कारणावरून एकाचा डोक्यात खोरे घालून खून..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : कोर्टातील ‘केस’मध्ये मदत करत असल्याच्या कारणावरून एकाचा डोक्यात खोरे घालून खून केल्याची घटना वंजारवाडी (ता.करमाळा) येथे काल (ता.१४) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी श्रीमती गिरजाबाई दतु केकाण (वय 55) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले कि, माझी सासु किसनबाई, सासरे सोपान आत्माराम केकाण यांचा भाच्चा वामन विठ्ठल दराडे (वय 63) हे अधूनमधून आमच्या घरी येत असत. मला मुल बाळ नाही, माझे पती 15 वर्षा पूर्वी मयत झाले आहेत. माझे पती यांनी मला मुलबाळ झाले नाही म्हणुन सिमाबाई दत्तु केकाण (रा. अकोले निरगुडे ता.इंदापुर) हीच्या सोबत लग्न केले होते.
सवत सिमाबाई हीच्या पासुन दादा दत्तात्रय केकाण, विदया, काजल, रूपाली असे मुले झाली होती. जमीनीच्या वाटपावरुन माझा व माझी सवत यांचा मुलगा दादा केकाण यांचा करमाळा कोर्टात वाद चालु आहे. माझे कोर्टात चालू असलेल्या केसमध्ये वामन विठ्ठल दराडे हे मदत करीत होते. माझा सावत्र मुलगा दादा दतु उर्फ दतात्रय केकाण हा वंजारवाडी येथे कधी तरी येत होता. गेले दोन महीनेपुर्वी तो आला होता.
त्यानंतर तो १२ ऑगस्ट रोजी सकाळी आला त्यांने मुक्काम केला, त्यानंतर १४ ऑगस्टला सकाळी 7/30 वा सुमारास घरासमोरील शेतातील पाइप फुटल्याने सामान आणणे करीता वामन विठ्ठल दराडे व दादा केकाण असे वामन यांचे मोटार सायकल वरून गेले. ते परत सामान घेवुन शेतात पाईप बसवला. त्यानंतर वामन दराडे हे शेतात दारे धरण्यासाठी गेले. त्यानंतर दादा केकाण हा पाठीमागून गेला. खोरे कोठे आहे म्हणून मला विचारले. मी त्याला खोरे तिथेच आहे असे सांगितले. तो खोरे घेऊन गेला व थोड्याचवेळात वामन दराडे इवळत असल्याचा आवाज आला. मी तिथे गेले त्यावेळी वामन दराडे हे खाली पडले होते. त्याचवेळेस दादा केकाण हा वामन यांची मोटारसायकल घेउन तेथुन पळुन गेला. यावेळी वामन दराडे यांच्या डोक्यात जखम झाली होती व डोक्यातुन रक्त येत होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. यात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.





