जेऊर येथे हुतात्मा एक्सप्रेस’ या रेल्वे गाडीला थांबा मिळवण्यासाठी शेकडोंच्या उपस्थितीत रेल्वे स्टेशनवर मोर्चा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ‘हुतात्मा एक्सप्रेस’ या रेल्वे गाडीला थांबा मिळवण्यासाठी जेऊर (ता.करमाळा) येथील रेल्वे स्टेशनवर शेकडोंच्या उपस्थित मोर्चा काढण्यात आला, याप्रसंगी प्रवाशी संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे थांब्याची मागणी केली, या मोर्चामध्ये विविध पक्ष संघटनांसह व्यापारी वर्गांसह महीलांचा मोठा सहभाग होता.

सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील लोकांना सोयीचे असलेल्या जेऊर रेल्वे स्टेशनवर नेहमी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते.पुण्याला दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या स्टेशनवरून सकाळी जाणाऱ्या हैदराबाद एक्स्प्रेसला स्लिपर बोगिचि संख्या कमी केल्यामुळे या स्टेशनवरून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत, फक्त एकच बोगी असल्याने बसण्यासाठी मोठी गर्दी होते, यामध्ये चंगराचेंगरीच्या घटनाही होत असून प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ येते.

यानंतर पुण्याकडे जाणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेस ला जेऊर स्टेशनला थांबा दिल्यास या परिसरातील साठ ते सत्तर गावातील लोकांची सोय होणार आहे, याच मागणीसाठी येथील प्रवासी संघटनेच्या वतीने २१ फेब्रुवारीला जेऊर रेल्वे स्टेशनवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, जेऊर येथील डॉ सुभाष सुराणा व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुहास सुर्यवंशी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जेऊर शहर परिसर व करमाळा तालुक्यातील विविध गावातील लोकांनी आज मोर्चा काढला.
यामध्ये विविध पक्ष संघटना व्यापारी वर्गांसह लोकांनी भरघोस प्रतिसाद देत जेऊर गावातून फेरी काढत शांततामय मार्गाने फेरी काढत स्टेशन प्रबंधकांना विविध मागण्यांचे निवेदन दिले .यावेळी डॉ सुभाष सुराणा, सुहास सुर्यवंशी पृथ्वीराज पाटील,अमरजित साळूंके, प्रा.शिवाजीराव बंडगर, ॲड.सविता शिंदे, शारदा सुराणा, महेंद्र पाटील, संजय चौधरी, नितीन खटके चंद्रहास निमगीरे यांची भाषणे झाली, यावेळी अनिल गादिया, मुबारक शेख, सुहास रोकडे, संदिप कोठारी, संपतलाल राठोड, सौ.लुणावत, दिनेश देशपांडे, सालेमान केसकर, प्रदिप पवार, सिद्धिविनायक जाधव आदिजण उपस्थित होते. स्टेशन प्रबंधकांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले, या मागणीसाठी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींनी ठराव देऊन व विविध संघटनांचे प्रतिनिधींनी निवेदन देऊन उपस्थित राहून पाठींबा दिला.
Video :