भांडणात मध्यस्थी करणाऱ्यास बेदम मारहाण..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.६ : पारेवाडी (ता.करमाळा) येथे ३ मे च्या रात्री ८ वाजता चालू भांडणात मध्यस्थी करून तुम्ही भांडू नका, असे म्हणणाऱ्यास तिघांनी बेदम मारहाण केली आहे, या प्रकरणी शिवाजी प्रभाकर सरवदे रा.पारेवाडी यांनी फिर्याद आहे. त्यात त्यांनी म्हटले, की ३ मे ला रात्री ८ वाजता मी पारेवाडी येथील शुभम भोसले व इतरा बरोबर बोलत होतो. त्यावेळी तिथे किरण काळे, कंकुल्या काळे, उर्मिला काळे सर्व रा.पारेवाडी हे आले व बसलेल्या लोकाबरोबर भांडू लागले. त्यावेळी मी तुम्ही निष्कारण का भांडता, आरडा ओरडा करू नका, असे म्हणालो असता, तु आम्हाला कोण सांगणार, असे म्हणून किरण काळे यांनी हातातील कोयत्याने माझ्या डाव्या हातावर मारहाण केली तर उर्मीला काळे ही डाव्या खांद्यावर चावली तसेच कंकुल्या भोसले यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.