उमरड येथे मोटारसायकलची चोरी -

उमरड येथे मोटारसायकलची चोरी

0

करमाळा(दि. 24) : उमरड (ता. करमाळा) येथे  मोटारसायकलची  चोरी झाली आहे. हा प्रकार  13 जूनच्या मध्यरात्री घडला आहे.याप्रकरणी विशाल चौधरी (वय 32) यांनी पोलिसात  फिर्याद  दिली आहे.

त्यात  त्यांनी म्हटले की,सन 2021 साली वैयक्तिक वापरासाठी बजाज प्लॅटीना कंपनीची लाल रंगाची मोटारसायकल (क्रमांक MH 45 AN 8698) ही खरेदी केली होती. 13 जून च्या रात्री 10 वाजता  मोटारसायकल घरासमोर लावली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 जून रोजी सकाळी साडेपाच वाजता उठून पाहिले असता मोटारसायकल लावलेल्या ठिकाणी दिसून आली नाही. घराच्या आजूबाजूला शोध घेतला, तसेच गावातील नागरिकांकडे विचारपूस केली; परंतु मोटारसायकलचा काही थांगपत्ता लागला नाही.

या मोटारसायकलची किंमत अंदाजे 35,000 रुपये  आहे. अज्ञात चोरट्याने हँडल लॉक तोडून गाडी चोरून नेली आहे. या प्रकरणी करमाळा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!