नियोजित ऊत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीसाठी मलवडीवरून नवीन लाईन मंजूर

केम (संजय जाधव): केम येथील नियोजित श्री ऊत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीसाठी व लिंबोणी मळ्यासाठी मलवडी लाईनवरून नवीन लाईन मंजूर करण्यात आली आहे. ही मंजुरी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून भगिरथ योजनेतून देण्यात दिली असून, लवकरच या कामास सुरुवात होणार आहे.

या प्रश्ना संदर्भात युवा नेते अजित तळेकर, श्रीहरी तळेकर, सतीश खानट, प्रगतशील बागायतदार हरिभाऊ तळेकर, धनंजय नाईकनवरे आणि कुंकू कारखानदार धनंजय सोलापूरे आदी जणांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी खासदारांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. भगिरथ योजनेतून ही नवीन लाईन खासदारांनी मंजूर करवून घेतली.
या नवीन लाईनमुळे गेल्या २५ वर्षांपासून रखडलेल्या श्री ऊत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीस नवी चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया कुंकू कारखानदार असोसिएशनचे सचिव मनोज सोलापूरे यांनी व्यक्त केली.


औद्योगिक वसाहतीच्या विजेचा हा प्रश्न सोडवल्याबद्दल खासदार धैर्यशील मोहिते पाटील व यासाठी पाठपुरावा करणारे केम येथील नेते अजित तळेकर यांचे शेतकऱ्यांनी व कुंकू कारखानदार यांनी आभार मानले.




