करमाळ्यात सहा तालुक्यातील पत्रकारांची 21 जानेवारीला ‘एक दिवशीय कार्यशाळा’…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : माढा, कर्जत, जामखेड, परंडा व इंदापूर या तालुक्यातील पत्रकारांसाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करमाळा येथील हॉटेल ‘राजयोग’ येथे रविवार 21 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत यावेळेत आयोजित करण्यात आली असून, या कार्यशाळेचा ग्रामीण भागातील पत्रकारांनी लाभ घ्यावा असे आव्हान करमाळा तालुका पत्रकार संघाने केले आहे.
या कार्यशाळेत लोकमतचे मुख्य संपादक संजय आवटे, आयबीएन लोकमतचे विलास बडे, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे,
ज्येष्ठ पत्रकार राजा माने, न्यूज 24 तास हिंदीचे विनोद जगदाळे, साप्ताहिक ‘संदेश’चे संस्थापक संपादक ॲड.डॉ.बाबुराव हिरडे, दैनिक लोकमत सातारा संपादक जगदीश कोष्टी, दैनिक पुण्यनगरीचे वेंकटेश पटवारी, रघुवीर मदने, दैनिक मानधनगरीचे सतीश सावंत, दैनिक सकाळचे पिंपरी वृत्त समूहाचे जयंत जाधव आदी पत्रकार मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी आमदार संजयमामा शिंदे,माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार शामलताई बागल, माजी आमदार नारायण पाटील, विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांचेसह तालुक्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या साठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योगपती व राणा शिपिंग कंपनी गोवा चे संचालक राणा दादा सूर्यवंशी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार नरसिंह मनोहरपंत चिवटे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या पत्रकारांच्या कार्यशाळेसाठी ग्रामीण भागातील पत्रकारांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका पत्रकार संघ केले आहे. या ठिकाणी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर सुद्धा घेण्यात येणार असून याचा लाभ सर्व पत्रकारांनी घ्यावा असे आव्हान सचिव नासिर कबीर यांनी केले आहे.