जुन्या पेन्शनसाठी सोलापूर जिल्हा परिषदेवर 28 जुलैला निघणार पेन्शन आक्रोश मोर्चा

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट पेन्शन योजना लागू करावी यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु शासनाकडून आश्वासने मिळण्याखेरीज काहीच मिळाले नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना महाराष्ट्रात सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन सरसकट जुनी पेन्शन सुरू करावी या एकमेव मागणीसाठी सर्व जिल्हा परिषदेवर पेन्शन मोर्चाचे आयोजन करणार आहे. त्या अनुषंगाने रविवार दिनांक 28 जुलै रोजी सोलापूर जिल्हा परिषदेवर पेंशन आक्रोश मोर्चा चे आयोजन केले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना जुनी पेन्शन संघटनेचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा नेते तात्यासाहेब जाधव हे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही जुनी पेन्शन ची मागणी करत आहे परंतु शासनाने या न त्या प्रकारे फक्त आश्वासने दिली आहेत प्रत्यक्षात मात्र काहीही मिळाले नाही.
आणि त्याचाच परिणाम म्हणून लाखोंच्या संख्येने कर्मचारी आंदोलने करीत आहेत तेव्हा या विषयाला आता शासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याची गरज आहे तेव्हाच हे वादळ थांबेल. रविवार दिनांक 28 जुलै रोजी सोलापूर येथे होणाऱ्या पेन्शन आक्रोश मोर्चा मध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे.


