अयोध्येहून आणलेल्या अक्षता कलशची केम मध्ये काढण्यात आली शोभायात्रा
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम येथे अयोध्येहून आलेल्या अक्षता कलशची शोभायात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या निमित्ताने श्रीराम मंदिरात पालखी रंगीबेरंगी फुलांनी सजवली होती. या पालखी मध्यें श्री रामाची मूर्ती व अक्षता कलश ठेवण्यात आले. त्यानंतर श्री राम मंदिरापासून या शोभायात्रेला सुरूवात झाली. यामध्ये श्री राम भजनी मंडळ विठ्ठल भजनी मंडळ, तसेच महिला भाविकांनी डोक्यावर कळशी घेऊन सहभागी झाल्या होत्या श्रीराम जयराम,जय जय राम अशा जय घोषाणी संपूर्ण केम नगरी दुमदुमून गेली होती. या शोभायात्रे मध्ये स्वराज्य रक्षक मर्दानी खेळाचे संस्थापक अक्षय तळेकर व त्यांच्या टिमने थरारक प्रात्यक्षिक करून दाखविली. हा खेळ गांधी चौकात झाला. हा खेळ पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या शोभायात्रेत श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सर्व सदस्य तसेच मंहत जयंतगिरी महाराज तसेच केम ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शोभायात्रेची सांगता मंदिरात पालखी आल्यानंतर श्री रामाच्या आरतीने झाली. त्यानंतर पराग कुलकर्णी यानी 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे श्री रामाची प्रतिष्ठापना होणार आहे. यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. त्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. तसेच या सोहळ्याचे प्रक्षेपण येथे दाखवण्यात येणार आहे याचा राम भक्तानी लाभ घ्यावा असे आवाहन केले. या शोभायात्रेसाठी दत्ता कुलकर्णी,पराग कुलकर्णी राहुल रामदासी विजय कुलकर्णी यानी परिश्रम घेतले
केम गाव कुंकवासाठी प्रसिद्ध असल्याने या शोभा यात्रा मार्गावर संपूर्ण गावात कुंकवाची रांगोळी घालण्यात आली होती जागो,जागी महिला भाविक रामाच्या मूर्तीचे औक्षण करीत होत्या संपूर्ण केम गाव राममय झाले होते.