करमाळा शहर दिवसभर कडकडीत बंद; सकल मराठा समाजाकडून प्रशासनाला निवेदन -

करमाळा शहर दिवसभर कडकडीत बंद; सकल मराठा समाजाकडून प्रशासनाला निवेदन

0

करमाळा (ता.२२) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या त्यांच्या मूळगावी उपोषण सुरु केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. अशात राज्यातील मराठा समाजाकडून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने व बहुजन समाजाच्या वतीने  काल (ता.२१)  ‘करमाळा बंद’ची हाक देण्यात आली होती.  या आवाहनाला करमाळा शहरातील नागरिक व व्यापारी यांनी १००% बंद पाळून आंदोलनाला प्रतिसाद दिला.

करमाळा शहरातील पोथरेनाका परिसर, छत्रपती चौक भवानीनाका परिसर तसेच मेनरोड, दत्तपेठ, राशीनपेठ, गुजरगल्ली, मारवाड गल्ली, वेताळपेठ येथील दुकानदार,व्यापाऱ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देत स्वयंस्फूर्तीने आपले व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. आज सकाळी १० वाजता सकल मराठा समाजाच्यावतीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन तहसील कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आंदोलकांनी तहसील कार्यालयाला निवेदन दिले

करमाळा तालुक्यातील जेऊरसह अनेक गावांतही बंदला सकारात्मक प्रतिसाद दिला. या बंद मुळे शहरातील व तालुक्यातील हातगाडी व फळविक्रेते यांनीही आपले दररोजचे विक्री बंद ठेवले होते. तसेच अनेक नागरिकांना या पुकारलेल्या बंद मुळे काही वस्तू खरेदी तसेच महत्वाचे कामे झाली नाहीत. एकंदरीतच या बंदमुळे आज सर्वत्र शांतता होती.

आंदोलकांनी मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत तहसील कार्यालय दणाणून सोडले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरवात करत सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत ही मोटार सायकल काढण्यात आली.  पोथरे नाका ते एसटी स्टँड, छत्रपती चौक ते  रिलायन्स पेट्रोल पंप व तेथून बायपासने जामखेड चौक, नगर रोड मार्गे मेन रोडने सुभाष चौकात रॅली आली. पुढे ही रॅली राशीन पेठला जाऊन तेथे रॅलीचा समारोप झाला.

सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!