उजनीत तात्काळ १० टीएमसी पाणी वरील धरणातून सोडावे धरणग्रस्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) –   उजनी धरणातून गरज नसताना नियम धाब्यावर बसवून सोडण्यात येत असलेले पाणी तात्काळ बंद करावे, उजनीच्या वरच्या धरणातून 10 टी एम सी पाणी तात्काळ उजनीत सोडावे अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा आज करमाळा इंदापूर, कर्जत, दौंड तालुक्यातील उजनी धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद याना निवेदनाद्वारे दिला.

दोन दिवसापूर्वी उजनी धरणग्रस्तांची महत्त्वपूर्ण बैठक भिगवण येथे पार पडली होती. या बैठकीत ठरल्याप्रमाणे आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद याना रितसर निवेदन देण्याचे ठरले होते . उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात गरज नसताना नियम धाब्यावर बसवून कॅनाल मधून सोडण्यात येत असलेले पाणी तात्काळ बंद न केल्यास 1 फेब्रवारी रोजी भिगवण ता. इंदापूर येथे सागर हाॅटेल समोर राष्ट्रीय महामार्ग अडवण्यात येणार असल्याची माहिती संघर्ष समिती चे अध्यक्ष प्रा.शिवाजी बंडगर यानी दिली .या निवेदनात अन्य प्रमुख मागण्यां करण्यात आल्या आहेत. त्यामधे उजनीच्या वरील 19 धरणातील 10 टी एम सी पाणी उजनी धरणात तात्काळ सोडण्यात यावे , सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्या साठी तयार होत असलेली समांतर जल वाहिनी चे काम तात्काळ पूर्ण करावे , कालवा सल्लागार समितीत करमाळा तालुक्यातील दोन व इंदापूर तालुक्यातील दोन धरणग्रस्त प्रतिनिधींचा समावेश करावा यांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद याना निवेदन देताना संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव बंडगर,उपाध्यक्ष भारत साळुंके , आदिनाथ चे अध्यक्ष धनंजय डोंगरे ,आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, माजी संचालक अजित रणदिवे,राजेंद्र धांडे,मकाई चे माजी संचालक नंदकुमार भोसले, केळी उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, इंदापूर तालुका धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष महारूद्र पाटील, इंदापूर खरेदी विक्री संघाचे संचालक विष्णू देवकाते,करमाळा बाजार समितीचे संचालक कुलदीप पाटील, माजी संचालक दादा मोरे,वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके, संघर्ष समिती चे सदस्य महादेव नलवडे ,सतीश राखुंडे,आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!