बँक पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने २६ जानेवारी रोजी बँकेसमोर आमरण उपोषण करणार असल्याचे सहकार आयुक्तांना निवेदन

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी)–  करमाळा अर्बन बँकेतील ठेवीदार गेले अनेक महिन्यांपासून ठेव रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा करत असून देखील त्यांना टाळाटाळ केली जात असून रक्कम मिळत नसल्याने येत्या २६ जानेवारी रोजी बँकेसमोर आमरण उपोषणास करणार असल्याचे निवेदन त्यांनी पुणे विभागाच्या सहकार आयुक्तांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही बँकेतील डिपॉझिट धारक असून आम्हांला बँक प्रशासक लागण्याच्या अगोदरपासून आम्हांला आमचे डिपॉझिट देण्याचे टाळाटाळ करत असून सदर बँकेला प्रशासकाची नियुक्ती झाल्यापासून दोन्ही प्रशासकांनी आम्हांला तुमचे डिपॉझिट वसुली झाल्यानंतर देऊ म्हणून शब्द दिला परंतु बँकेने आम्हांला अद्यापपर्यंत दिलेले नसून बँकेचे प्रशासक, संचालक मंडळ आमची चेष्टा करत असून आमच्यापैकी बरेच वयोवृध्द झालेले असल्याने आम्हांला दवाखान्याच्या खर्चासाठी सुध्दा बँक पैसे देण्याचे टाळाटाळ करत आहे. त्यामुळे येत्या २६ जानेवारी रोजी बँकेसमोर आमरण उपोषणास करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर मंगल बबन डोंगरे, सुरेखा देशमाने गीता देशमाने, गणेश देशमाने सचिन फलके रामचंद्र साळवेकर, गणेश रंदवे नितीन ओंभासे, सुधाकर ओंभासे, प्रकाश सावंत,मंगल सुरवडे,सुरेश पांडकर, असण शहा, मौला मुलाणी, जनाबाई वसंत दगडे आदींच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!