सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या तात्काळ अटकेसाठी मराठा महासंघाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : बीड जिल्हयातील मस्साजोग या गांवचे विद्यमान सरपंच संतोष देशमुख यांची जी निघृण हत्या करण्यात आली. त्या घटनेस तीन आठवडे उलटून देखील त्यातील मुख्य तीन आरोपी यांना अटक झालेली नाही. या आरोपीना तात्काळ अटक करण्याबाबत मराठा महासंघ यांच्यासह सकल मराठा बांधवांकडून तहसील यांना निवेदन देण्यात आले.

सदर निवेदन देताना अखिल भारतीय मराठा महासंघ तालुका प्रमुख दिनेश घोलप, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सुनिल सावंत, हनुमंत मांढरे, वीटचे बाळासाहेब ढेरे, संजय घोरपडे, फारूक जमादार आदी मान्यवर उपस्थित होते. या निवेदनावर प्रसाद जगताप,
आप्पासाहेब होनप, दादासाहेब तनपुरे, ॲड.राकेश देशमुख, ॲड.शेरे शिवराज, राजेंद्र घळके, बिचितकर कैलास, कुणाल पाटील आदि जणांनी सह्या केल्या आहेत. याप्रसंगी अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

या घटनेच्याबाबत कडक कारवाई होणेबाबत बीड येथे लाखोंच्या संख्यने जन आक्रोश आंदोलन देखील झालेले आहे. त्यातून जनतेच्या मनातून खदखद भावना दिसून येत आहे. सदर घटनेबाबत लोकप्रतिनिधी मराठा भुषण आ.सुरेशआण्णा धस यांचेसह त्यांचे सहकारी व लोकसभा प्रतिनिधी खा.बजरंग बप्पा सोनवणे यांचेसह सर्व लोक प्रतिनिधींनी तात्काळ कारवाई व्हावी याबाबत शासन दरबारी मागणी केलेली आहे. तरी या घटनेची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये याकरीता आरोपींना कठोरात कठोर कारवाई करावी ही सर्व समाज बांधवांच्यावतीने शासन दरबारी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!