वडशिवणे येथे दहा एकर क्षेत्रावरील  उसाला अचानक लागली आग - शेतकऱ्यांचे २५ ते ३० लाख रूपयाचे नुकसान - Saptahik Sandesh

वडशिवणे येथे दहा एकर क्षेत्रावरील  उसाला अचानक लागली आग – शेतकऱ्यांचे २५ ते ३० लाख रूपयाचे नुकसान

केम (संजय जाधव) –  करमाळा तालुक्यातील वडशिवणे येथील १० ते १२ एकर क्षेत्रावरील आडसाली ऊसाला दि ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वा सुमारास अचानक आग लागली. या मध्ये सुमारे २५ ते ३० लाखाचे नुकसान झाले आहे. यामध्ये १२ एकर,उस, पाईप व ड्रीपसह आगीत जळून खाक झाले.

कविटगाव रोडलगत ऊसाची शेती मोठया प्रमाणावर झाली आहे बुधवारी दुपारी अचानक आग लागली ही महिती कळताच १५० ते २०० लोकांनी आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या मध्ये, त्यांना काही प्रमाणात यश आले. यामुळे बाकिच्या शेतकऱ्यांचा ऊस वाचला.महादेव बाबर, विठृल बाबर यांच्या शेतामधुन एल,टी लाईन गेली आहे तारेचे स्पाकींग होऊन याच्या ठिणग्या ऊसामध्ये पडल्या या मुळे हि आग लागली अशी माहिती बाळासाहेब,वणवे या शेतकऱ्यांनी दिली.

या आगीमध्ये बाळासाहेब,वणवे, बंकट,वणवे,महारूद्र बाबर, विठ्ल बाबर, लक्षमण भानवसे, महादेव बाबर, बापू पन्हाळकर, या शेतकऱ्यांचा ऊस व ईतर साहित्य जळाले सदर घटनेची माहिती मिळताच तलाटी राजाभाऊ,आदलिंगे, कृर्षी सहाय्क ज्ञानेश्वर सरडे यानी भेट देऊन पाहणी केली या मध्ये अंदाजे २५ तेब३०लखाचे शेतकऱ्यंचे नुकसान झाले शेतकऱ्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे आडसाली ऊस संभाळला होता, तो ३० ते ३५ कांडयावर आला होता. या मुळे शेतकरी चिंतेत आहेत. शासनाकडून योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!