करमाळ्यात ज्ञान-रसिकांसाठी तीन दिवसीय बौद्धिक मेजवानी -

करमाळ्यात ज्ञान-रसिकांसाठी तीन दिवसीय बौद्धिक मेजवानी

0

करमाळा : सर्वोदय प्रतिष्ठान करमाळा यांच्या वतीने तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. ही व्याख्यानमाला २९ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान विजयश्री सभागृह, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथे रोज सायं. ६ वाजता पार पडणार आहे.

पहिल्या दिवशी २९ ऑगस्ट रोजी माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर “मनाची अमर्याद शक्ती व तणावमुक्ती” या विषयावर मार्गदर्शन करतील.
३० ऑगस्ट रोजी कवी-व्याख्याते प्रा. संदीप जगताप “कविता आणि बरंच काही…” या विषयावर आपले विचार मांडतील.
तर समारोपाच्या दिवशी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध वक्ते डॉ. संजय कळमकर “जगण्यातील आनंदाच्या वाटा” या विषयावर व्याख्यान देतील.

या व्याख्यानमालेतून नागरिकांना सकारात्मक विचारसरणी, साहित्यिक आनंद आणि जीवनमूल्यांबद्दल मार्गदर्शन मिळणार आहे. करमाळा परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या बौद्धिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!