कंदर ग्रामपंचायतसाठी तिरंगी लढत तर सरपंच पदासाठी पाच जण रिंगणात..

0

कंदर प्रतिनिधी / संदीप कांबळे…

कंदर : करमाळा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या कंदर ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाले असून यावेळी गेल्या निवडणुकी प्रमाणेच तिरंगी लढत होत असून सरपंच पदासाठी पाच जण आहेत त्यामध्ये कोण विजय होईल याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीत अनेक पदाधिकारी निवडणूक लढवत आहेत .यामध्ये विद्यमान उपसरपंच मौला मुलानी हे ग्रामविकास परिवर्तन पॅनल कडून सरपंच पदासाठी उभे आहेत. तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमर भांगे, इरफान जहागिरदार, छाया निकम,सचिन यादव, दीपक घोडकोस हे पुन्हा सदस्यांसाठी निवडणूक मैदानात उभे आहेत. तसेच माजी सरपंच छाया भगत, माजी उपसरपंच कुबेर शिंदे, माजी उपसरपंच रावसाहेब जाधव, माजी सदस्य नागनाथ कदम, रतन मंगवडे पुन्हा सदस्य पदासाठी निवडणूकीत उभे आहेत.

तसेच गेल्या वेळेस निवडणूक लढले उमेदवारही यावेळेस निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक एकतर्फे न होता चुरशीची होईल .असा राजकीय अंदाज व्यक्त होत आहे .सरपंच पदासाठी मौला मुलानी गणेश जगताप उद्धव भोसले उमेश इंगळे संतोष शिंदे हे आपले नशीब आजमावत आहेत .त्यांनी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला असून निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. आणि थंडीत ही निवडणूक होत असल्याने वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

या निवडणुकीत आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक नवनाथ भांगे आदिनाथ कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन नानासाहेब लोकरे माजी संचालक नवनाथ शिंदे तसेच भास्करराव भांगे अण्णासाहेब पवार गोपाळ मंगवडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे मतदार कोणाला संधी देतात हे सहा नोव्हेंबरला समजणार आहे हे मात्र नक्की… सरपंच पदासाठी उमेश इंगळे व संतोष शिंदे हेही अपक्ष म्हणून उभे आहेत . एकंदरीत चुरशीची निवडणूक होत आहे.. सदस्य पदासाठी थेट तीन गटात लढत होत आहे तर सरपंचासाठी दोन अपक्ष असल्याने मोठी चुरस होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.. गेल्या पाच वर्षात आपण सात कोटीच्या आसपास विविध विकास कामे केली असल्याने मतदार पुन्हा एकदा आमच्याच पॅनल ला संधी देतील असा आत्मविश्वास सरपंच प्रतिनिधी भास्कर भांगे यांनी व्यक्त केला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!