विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती आणि सासूला दोन दिवसांची पोलीस कोठडी -

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती आणि सासूला दोन दिवसांची पोलीस कोठडी

0

करमाळा(दि. १३): शहरातील कानाड गल्ली येथील २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्या प्रकरणी तिचा पती व सासूला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने करमाळा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वैष्णवी प्रदीप माने (वय २८) या विवाहितेने ११ जून रोजी राहत्या घरातील बेडरूममध्ये सिलींग फॅनला ओढणीने गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर तिच्या आईने करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीत पती प्रदीप माने, सासरा भारत माने आणि सासू कमल माने हे तिला सतत चारित्र्यावर संशय घेऊन व माहेराहून पैसे आणण्याच्या कारणावरून मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. त्यामुळे वैष्णवी हीने आत्महत्या केली आहे.

या फिर्यादी नंतर पोलीसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी पती प्रदीप माने आणि सासू कमल माने यांना अटक करून आज (१३ जून) करमाळा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश श्रीमती एस. पी. कुलकर्णी यांनी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सासऱ्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वैष्णवीचा विवाह सन २०१८ साली झाला होता. त्या वेळी सगळं सुरळीत असल्याचं वाटत असतानाही मागील दोन वर्षांपासून तिला छळ होत असल्याचे तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. “संसार टिकावा म्हणून तिला समजावत राहिलो, पण अखेर तिने आयुष्यच संपवले”, असे वेदनादायी वक्तव्य तिच्या आईने केले. या घटनेमुळे करमाळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून समाजात चर्चा सुरू झाली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

“एकच नाव… एकच वेदना… पुन्हा घडू नये तिसरी वैष्णवी..!”

विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या – करमाळा शहरातील घटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!