‘भाजपा’चे ‘कमळ’चिन्ह चक्क डोक्यावर कोरले – नाईक-निबांळ्कर यांच्या प्रचारार्थ करमाळ्यातील भाजपच्या कार्यकर्त्याचा अनोखा प्रचार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सध्या लोकसभा निवडणुकीची धांदल उडाली असून प्रत्येक पक्षाचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या आधारे आपला प्रचार करत आहेत परंतु करमाळ्यातील एका भाजपच्या कार्यकर्त्याने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ भाजपाचे गणेश जगताप यांनी आपल्या डोक्यावर कमळ चिन्ह काढून भाजपचा एक अनोखा प्रचार सुरू केला आहे. हे भाजपचे कार्यकर्ते श्री.जगताप यांचा हा फोटो करमाळा तालुक्यात प्रचंड व्हायरल झाला असून, सध्या तरी या भाजपच्या कार्यकर्त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.



