बस मधून महिलेची ३ लाख ८ हजाराची चोरी…

करमाळा (दि.२१): बस मधून प्रवास करताना महिलेच्या पिशवीतील सोन्याच्या दागिण्यांची चोरी झाली आहे. हा प्रकार १५ मे ला दुपारी एक वाजता जेऊर बसस्थानक ते आदिनाथ साखर कारखाना या प्रवासादरम्यान घडला आहे. या प्रकरणी उर्मिला आनंदकुमार कोंडलकर रा.लव्हे यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की १५ मे ला माझ्या मावसभावाच्या लग्नासाठी निघालो होतो. जेऊर येथे एकच्या सुमारास पंढरपूरकडे जाणाऱ्या बसमध्ये बसले असता, एकच्या सुमारास आदिनाथ कारखान्याजवळ आल्यावर मी माझ्या बॅगेतील दागिणे चेक केले असता, २ लाख ३८ हजाराचे तीन तोळे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन व ७० हजार रूपयाचा १ तोळा वजनाचे सोन्याचा टोकर चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



