जेऊर येथे तरुणावर लाथाबुक्यांनी व दगडाने हल्ला..

करमाळा : जेऊर (ता. करमाळा) येथे चिखलठाण चौकात मोबाईल पाहत उभ्या असलेल्या तरुणावर चुलत भावासह दोघांनी लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण केल्याची घटना मंगळवार, 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

या घटनेबाबत किरण दत्तु माने (रा. लव्हे रोड, जेऊर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ते चौकात उभे असताना चुलत भाऊ दिपक माने व सुरज भागवत माने तेथे आले. “तू आमचा फोटो का काढला” असा जाब विचारत त्यांनी शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यानंतर दिपक माने याने दगड उचलून किरण माने यांच्या डोक्यावर मारला, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.


